J1 झालं का?
J1 झालं का...?😉
किंवा जेवायला कधी येऊ?😋 हा एक खूप कॉमन प्रश्न स्त्रियांना👩 आणि खास करून सूंदर स्त्रियांना👸 फेबुवर पुरुषांकडून विचारण्यात येतो.
माहीत नाही🤔 स्त्रियांना💃 दिवसागणिक अश्या किती पुरुषांच्या👨 प्रश्नांना ❓❓❓तोंड द्यावे लागते? आणि हे पण माहीत नाही ते त्या पुरुषांना👨 कसं हाताळतात? (कारण मी सुंदर स्त्री नाही.😍)
पण एक गोष्ट नक्की माहीत आहे की फेबुवरील पुरुषांना स्त्रियांना जेवू🍲 घालायची खूप हौस आहे.😜
J1(जेवण)....! एक कामक्रीडेशी💏 उच्चाराने साधर्म्य असलेला शब्द, आणि समस्त फेबु जगतातील पुरुषांचा👨 सर्वात आवडता शब्द.
का बरं पुरुषांना आवडत असेल असे प्रश्न विचारायला स्त्रियांना?🤓
मला वाटत एक सायकॉलॉजीकल👼 कारण असं असू शकत की जी गोष्ट वास्तव जगात🌐 शक्य होत नाही ती गोष्ट आभासी🌀 जगतात सहज शक्य असल्याने पुरुषांचा ताल☃ सुटतो. कारण प्रत्यक्ष दुनियेत ही गोष्ट केलीतर कानफटात मारून घायची, चपलेचा👡 मार खायची अथवा पब्लिक कडून धोपटून👊 घ्यायची रिस्क असते. पण आभासी दुनियेत समोरची स्त्री ब्लॉक🚫 करण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाही.
असे असले तरी माझ्या मते खरी गोम ही पुरुषाच्या स्त्री कडे पाहण्याच्या दृष्टिकोनात👀 आहे असे मला वाटते. वेदिक काळात वेश्यांना पण सन्मानाने वागवण्याची भारताची संस्कृती होती. पण नंतर मोघलांच्याकडे व पाठोपाठ इंग्रजांच्याकडे शतकोनशतके केलेल्या गुलामी मुळे स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन भारतीय समाजाचा बदलला तो कायमचाच.
स्री जी पूजनीय व्यक्ती होती ती आता उपभोग्य "वस्तू"🎁 झाली. आणि आता तर स्त्री आणि J1 हे एक घट्ट समिकरण झाल आहे. स्त्री ही पुरुषांची एकमेव खाजगी वस्तू असून ती पुरुषांची कामवासना💏 क्षमवण्यासाठीच उत्पन्न झाली आहे असा ठाम समज समस्त पुरुषवर्गाचा झालेला आहे. काही पुरुष तर J1 वाढण्याचं समाजकार्यच करायला निघालेले असतात. म्हणजे त्यांचा त्यांच्यापुरता गोड गैरसमज असा असतो की समोरची स्त्री ही कामवासनेने अतृप्त आहे, खास करून विधवा, परित्यक्ता, डिव्होर्सी इ.इ. आणि मीच एकमेव योग्य पुरुष तुमची कामवासना पूर्ण करण्यासाठी व मीच सक्षम💪 पुरुष आहे असा सांगण्याचा त्यांचा आटापिटा असतो. अर्थात लाखात एखादा खूप चांगला पुरुष असतो आणि तो उरलेल्या ९९,९९९ पुरुषांची पापं धुतो. आणि म्हणूनच मला वाटत स्त्रिया👯 अजून ह्या भूतलावर टिकून आहेत.
अनेक भारतीय🇮🇳 समाजात तर पुरुषाची कामवासना पूर्ण करणे हे तर पत्नीचे आद्य कर्तव्य आहे असे संस्कारच मुलींवर👧 कोवळ्या वयापासून केलेले असतात. कित्येकवेळा समाजात आपण असे पाहतो की पुरुषांनी मद्यप्राशन🍷, धूम्रपान🚬, वेश्यागमन💃 केले तर काहीच गैर नाही पण तेच जर स्त्रियांनी केले तर संस्कृतीच्या मर्यादा ओलांडण्याचं पाप त्यांच्या कपाळी येतं.
'बॅचलर पार्टी' 🍻इंग्रजांनी💂 भारताला दिलेली एक सांस्कृतिक सप्रेम भेट🎁. भारतात खासकरून पंजाब, उत्तरेकडील भारत व महाराष्ट्रातील काही भाग येथे जवळ जवळ ही समाजमान्यच गोष्ट आहे. उत्तरेकडे त्याला 'नस तुडवानेकीं पार्टी' म्हणतात. म्हणजे लग्नाच्या आदल्या दिवशी बॅचलर मित्रां बरोबर भरपूर मद्यप्राशन🍾 ढोसून मस्त मजेत एखाद दोन स्त्रियां बरोबर येथेच्छ संभोग करायचा आणि स्वतःच्या बॅचलर जीवनाला किंवा 'कुमार' अवस्थेला कायमचा राम राम👐 ठोकायचा असा हा कन्सेप्ट. परंतु मला एक प्रश्न त्या बॅचलर पार्टी करणाऱ्यांना विचारावासा वाटतो की, तुमच्या नववधूने पण 'बॅचलर पार्टी' केली तर तिला वरमाला घालाल का? नाही ना! म्हणजे सर्व काही बंधन स्त्रीवर, पण पुरुषांनी मात्र J1, J1 करत फिरायचं. मग त्याच पुरुषांना मला एक प्रश्न विचारावासा वाटतो की, एक दिवस तुमची प्रिय बायको तुम्हाला लाडात येऊन म्हणाली की, "आज किनई खूप मज्जा आली...! मला किनई आज १०८ 'J1'च्या रिक्वेष्ट इनबॉक्समध्ये आल्यात!💗💗" तर तुम्ही द्याल का तिला आनंदाने टाळी👋 वर टाळी👋? फोडून🔨 टाकावसा वाटेल न तुम्हाला तिचा मोबाईल📱?
मग कशाला फेबुवरील इतर स्त्रियांना👩 J1..? J1...? करत बसायचं? बायकोचं👰J1 जेवांना....🤓🙏
-संदेश केसरकर
Comments
Post a Comment